गंगापुरात लिंबू - पाणी नऊ दिवसांच्या उपवासाची यशस्वी सांगता

Foto
मानस योग साधना केंद्राचा उपक्रम : शहरातील ५७ नागरिकांनी अनुभवली निसर्गशक्ती

गंगापूर, (प्रतिनिधी): जास्त खाल्ले म्हणजे जास्त ऊर्जा मिळते हा सर्वसामान्यांचा समज खोडून काढत, निसर्गशक्तीच्या जोरावर शरीर केवळ लिंबू, मध आणि पाण्यावरही नऊ दिवस ठणठणीत राहू शकते, याचा प्रत्यय गंगापूरकरांनी घेतला.

छत्रपती संभाजीनगर येथील मानस योग साधना केंद्राअंतर्गत तप - सेवा सुमिरण समितीद्वारे आयोजित भोजन से शक्ती नहीं या वैश्विक सिद्धांतावर आधारित सात दिवसीय विशेष उपवासाची उत्साहात सांगता झाली. मेरठ येथील मानस योग साधना प्रणीत हा नवरात्र उपवास अत्यंत कठोर मानला जातो. १९ मार्चपासून सुरू झालेल्या या साधना सप्ताहात गंगापुरातील ५५ कुटुंबांतील लहानांपासून वृद्धांपर्यंत एकूण ५७ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.

 अन्नत्याग करून केवळ नैसर्गिक घटकांवर राहूनही शरीरातील चैतन्य टिकवून ठेवण्याचा
अनोखा अनुभव या उपासकांनी घेतला. या सात दिवसांच्या काळात केवळ शारीरिक शुद्धीच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्थित्यंतराचाही अनुभव आल्याची प्रतिक्रिया उपासकांनी दिली.
 हा सप्ताह आमच्या आयुष्यात सामाजिक जाणिवांची भर घालून गेल्या, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन या उपक्रमातून मिळाला आहे. वाढते आजार आणि बिघडलेली जीवनशैली यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येकाने वर्षातून किमान दोनदा (नवमी व नवरात्रीत) असा उपवास करून स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन तप सेवा - सुमिरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या यशस्वी उपक्रमामुळे परिसरात आरोग्याप्रती एक नवी जनजागृती निर्माण झाली आहे.